*सूचना*
महाविद्यालयातील सर्व द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (संदर्भ:- परिपत्रक क्र. १०२/२०२०, दि. ०९ सप्टे. २०२०) नुसार अंतिम सत्र/ वर्ष पात्र विद्यार्थ्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने सुद्धा परीक्षा देता येईल. याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवरून विकल्प अर्ज (Option Form) उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विकल्प अर्ज भरण्याची मुदत दि. १३ सप्टे. २०२० पर्यत आहेत. यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील द्वितीय व तृतीय वर्षातील (शै. वर्ष. २०१९-२०२०) मधील सर्व विद्यार्थ्यांना लॉगीन आयडीवरून विकल्प अर्ज (Option Form) उपलब्ध भरुन घ्यावा याची सर्वांनी नोंद घ्यावी.
** महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्याना कळविण्यात आनंद वाटतो कि, भूगोल विभागाने Geographical Knowledge Katta या नावाने अलीकडेच एक you tube channel चालू केला आहे. पुढील लिंक ला क्लिक करून आपण channel ला भेट द्या व subscribe करा.
** महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला /विज्ञान व् वाणिज्य वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक १०/०३/२०२० पर्यंत पर्यावरण जाणीव जागृती विषयाचे प्रकल्प अहवाल तपासून घ्यावेत अन्यथा पर्यावरण जाणीव जागृती विषयाच्या परीक्षेत बसता येणार नाही याची नोंद घ्यावी.
** महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला व विज्ञान वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की भूगोल विषयाच्या प्रथम सत्र परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक १४ /०३ /२०२० पर्यंत प्रत्यक्षिक/ अंतर्गत विषयाचे परीक्षेसंदर्भात प्रा. लाढांने सरांशी प्रत्यक्ष संपर्क साधून पूर्ततता करावी. या उपर होणाऱ्या नुकसानीस महाविद्यालय जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक ०५ /०३ /२०१९ रोजी पेपर १ व पेपर २ या विषयांच्या अंतर्गत परीक्षा (Internal Test ) होतील सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक ९:०० वा. उपस्थित रहावे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.